“मी भेटण्या येईन पुन्हा…..”

तू यावेस, आस लागता भेटीची,
सरता ना सरे वेळ , वाट पाहता त्या दिसाची…
भेट तुझी , झुळूक जशी मंद वाऱ्याची,
अनुभवावी नव्याने, ओढ तीच ओळखीची…
मन हर्षुनी गेले, कृष्णासखा भेटता,
सोबती निराशा, दिवस सरता सरता….
निरोप घेता तुझा, मन झाले उदास,
समजाविले त्याला, पुन्हा भेटण्याची आस…
मन उदास तुझेही, पुन्हा तें परतणे,
देह जरी निघाला, चित्त मागे राहिले….
तू चाल पुढे, न पाहे मागे वळूनी…
सोबती तुझेच, आठवणीत तुझ्याच अजुनि…
कृष्णसखा, मन मोहूनि करी अलविदा,
म्हणे, मी भेटण्या येईन पुन्हा…
मी भेटण्या येईन पुन्हा…..